Suresh Kakani on Corona : कोरोनाच्या 95 टक्के केस या इमारतीतून आहेत तर पाच टक्के केस या झोपडपट्टीतून
मुंबई : कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची बैठक झाली. बैठकीत सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. आजच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. मात्र निर्बंध लावण्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी दिली आहे. तसेच मुंबईत ओमायक्रॉनचा समूह संसर्ग झाला की नाही हे जिनोम स्क्विन्सिंग अहवालानंतरच स्पष्ट होईल असे देखील ते म्हणाले.
मुंबईत ओमायक्रॉनचा समूह संसर्ग झाला का हे अहवालानंतर स्पष्ट होईल
मुंबईत ओमायक्रॉनचा समूह संसर्ग (Community Spread) वाढला आहे, अशी माहिती समोर येत आहे. यावर काकणी म्हणाले, मुंबईत ओमायक्रॉनचा समूह संसर्ग झाला आहे की नाही हे सांगण्यात सध्याच्या घडीला कठीण आहे. 21 डिसेंबर पासून आलेल्या पॉझिटिव्ह केसेसचा जिनोम स्क्विन्सिंग अहवाल आज किंवा उद्या मध्ये येईल, त्यानंतर कळेल ओमायक्रॉनचा समूह संसर्ग झाला आहे की नाही? या अहवालानंतरच चित्र स्पष्ट होईल. या वाढीव रुग्ण संख्या आहे की ओमायक्रोनमुळे आहे की डेल्टामुळे की इतर विषाणूमुळे हे अहवालानंतर स्पष्ट होईल.