Central Railway Mumbai : मध्य रेल्वेवर चार नवे टर्मिनस उभारणार
Central Railway Mumbai : मध्य रेल्वेवर चार नवे टर्मिनस उभारणार मध्य रेल्वेवर चार मेगा टर्मिनस उभारण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई आणि परिसरात सहा ठिकाणांची चाचपणी सुरू झाली आहे. पनवेल, कल्याण, कळंबोली, डोंबिवली, ठाणे आणि परळ या ठिकाणी मेगा टर्मिनस उभारता येईल का, याची विचार करण्यात येतोय. मात्र सलग जागा मिळणं शक्य होत नाहीये. कारण या मेगा टर्मिनससाठी साडे सात एकर जागेची गरज आहे. कारण इथं ६ प्रवासी फलाट, ६ देखभाल मार्गिका, ६ पार्किंग मार्गिका आणि १० अन्य मार्गिका असणार आहे. या नव्या टर्मिनसवरून लांब पल्ल्याच्या ४० नव्या एक्स्प्रेस चालवण्याचा रेल्वेचा प्लॅन आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारनं तिसरी मुंबई उभारण्याचा निर्णय काही आठवड्यांपूर्वी जाहीर केला होता. पनवेल आणि कळंबोली ही ठिकाणं या तिसऱ्या मुंबईपासून खूप जवळ आहेत, आणि तिथं देखील हे मेगा टर्मिनस उभारलं जाण्याची शक्यता आहे.