BJP Protest Mumbai : नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा मुंबईत मोर्चा ABPMajha
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. ठाकरे सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा त्वरित घ्यावा, या मागणीसाठी मुंबई आज विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. आधी भायखळा इथून आझाद मैदानाकडे निघणार होता. मात्र याला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर हा मोर्चा आता आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा होणार आहे. या मोर्चासाठी आझाद मैदानात एक मोठे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. याचबरोबर शेकडो खुर्च्या आणि बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आले आहेत. फक्त आझाद मैदान नाही तर संपूर्ण मुंबईभर असे शेकडो बॅनर्स भाजपने लावले आहेत. साडे दहा वाजताच्या दरम्यान या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होणार आहे.






















