Ashish Shelar : आशिष शेलारांकडून नालेसफाईची पाहणी, 'पाहणीनंतर कामात तफावत' - शेलार
मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आज मुंबईच्या पूर्व उपनगरातील नालेसफाईची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप खासदार, आमदार, माजी नगरसेवकही उपस्थित होते.. यातील बहूसंख्य ठिकाणी नुकतीच कामाला सुरुवात झाली होती तर अजून ही गाळाचे ढीग नाल्यात दिसून येत आहेत. प्रत्येक ठिकाणी काढण्यात आलेला गाळ आणि प्रत्यक्षातील चित्र हे अधिकाऱ्यांसोबत पडताळणी करुन आमदार आशिष शेलार यांनी यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिलंय.. ठाकरे गटांच्या नगरसेवक, नेते, आदित्य ठाकरे हे सगळे सफाईकामाची पाहणी करायला तयार नाहीत. ते कंत्राटदारांनी दिलेल्या आकड्यांवर समाधान व्यक्त करत आहेत. त्यावर आमचा विश्वास नाही. म्हणून प्रशासनाने फेरतपासणी करावी, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली..























