Zero Hour With Sarita Kaushik : मनोज जरांगेंनी कसली विधानसभेसाठी कंबर? कोणत्या पक्षाला फटका बसणार?
Zero Hour With Sarita Kaushik : मनोज जरांगेंनी कसली विधानसभेसाठी कंबर? कोणत्या पक्षाला फटका बसणार?
येत्या विधानसभा निवडणुकीत स्वराज पक्ष सर्व जागा लढवणार असून महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्याशी संबंध नसणार असल्याचा खुलासा छत्रपती संभाजी राजे यांनी आज केला . मनोज जरांगे पाटील यांच्याशी निवडणूक बाबत राजकीय चर्चा अजून झाली नसली तरी आम्ही ती करणार असल्याचे सांगत या विधानसभेला तिसरी आघाडीची शक्यता संभाजीराजे यांनी बोलून दाखवली . आज भोसे येथे स्वराज्य पक्षाचे नेते प्रा महादेव तळेकर यांनी आयोजित केलेल्या महामंडळ महा एक्स्पो सोहळ्याच्या उदघाटनाला आले असता संभाजीराजे बोलत होते . यावेळी राजरत्न आंबेडकर हे देखील उपस्थित होते . मनोज जरंगे यांचा दृष्टीकोण आणि माझ उद्दिष्ट एक असल्याचे सांगत मनोज जरंगे, संभाजी राजे छत्रपती विधानसभेला एकत्र येणार असल्याचे संकेत दिले . महाविकास आघाडी व महायुती सोबत जाण्याचा प्रश्न नाही. आरक्षण देण्यापेक्षा ते आरक्षण कसं टिकेल यावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले . यापूर्वी दोन वेळा आरक्षण मिळाले आहे मात्र टिकले नाही. राज्यात मराठा ओबोसी समाजात वाद निर्माण झाले नाही पाहिजे यांची सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे असेही त्यांनी सांगितले .