Zero Hour : अजित पवारांना परत पक्षात घेणार? शरद पवारांचं सूचक विधान
Zero Hour : अजित पवारांना परत पक्षात घेणार? शरद पवारांचं सूचक विधान
सत्ताधारी महायुतीतल्या राष्ट्रवादीला बसलेल्या धक्क्याची.. कशाप्रकारे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांकडून खिंडार पाडलं जातंय ते पाहूया...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शरद पवारांनी.. पुतण्याला अर्थात अजित पवारांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात.. पिंपरी-चिंचवडमध्ये सुरुंग लावलाय.. राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह, २० माजी नगरसेवकांनी दादांची साथ सोडून.. काकांचा हात धरलाय.. पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला... अजित गव्हाणे हे सध्या दादांसोबत असलेले माजी आमदार विलास लांडेंचे समर्थक मानले जातात... लोकसभा निकालांनंतर राजकीय वारे महाविकास आघाडीच्या बाजूने वाहू लागले... जनमत साहेबांच्या बाजूने असल्याचे दिसू लागल्याने अजितदादांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली.. आणि तेव्हापासूनच अनेक आमदार-नेते पुन्हा शरद पवारांकडे जाण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने नेत्यांनी सोडलेली साथ अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय.. दरम्यान या प्रवेशावेळी जेव्हा शरद पवारांना अजितदादांसाठी घरात जागा आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.. तेव्हा शरद पवारांनी एक सूचक विधान केलं,























