Mumbai Metro Line 3 : वरळी भुयारी मेट्रो स्थानकात पाणी, मेट्रोचं दार उघडताच तळ्याचा भास
Mumbai Metro Line 3 : वरळी भुयारी मेट्रो स्थानकात पाणी, मेट्रोचं दार उघडताच तळ्याचा भास
राज्यासह आता मुंबईत देखील मान्सून (Mumbai Rains Updates) दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तसेच मान्सूनने मुंबईत दाखल होण्याचा रेकॉर्ड देखील मोडला आहे. मुंबईतील पावसाचा मेट्रो-3 प्रकल्पाला (Mumbai Rains Aqua Line Metro) फटका बसला आहे.
मुंबईतील महत्त्वकांशी प्रकल्प एक्वा लाइन-3 ला पावसाचा फटका बसला आहे. मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले आहे. मेट्रोमधून उतरताच प्रवाशांना तळ्यात उतरल्याचा भास होताना दिसला. दरम्यान, पाणी साचल्यानंतर मेट्रो सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भुयारी मेट्रोकडे जाणारे गेटही बंद करण्यात आला आहे. मुंबईतील अंडरग्राउंड मेट्रो-3 ही नुकतीच धावू लागली. मात्र मुंबईतील पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोला याचा फटका बसला.























