(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kumbh Mela: कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांनी कोविड चाचणी करावी, वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Kumbh Mela: कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांनी कोविड चाचणी करावी, वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
हरिद्वार (उत्तराखंड) येथे झालेल्या कुंभमेळ्यासाठी वर्धा जिल्ह्यातून गेलेले काही भाविक आता परतीच्या वाटेवर आहेत. वर्धा जिल्ह्यात वाढत असलेली कोविड रुग्णांची संख्या आणि दिवसेंदिवस होत असलेला विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कुंभमेळ्याहून परतणाऱ्या सर्व भाविकांनी जिल्ह्यात परत आल्यावर स्वतः कोविड सेंटर इथे जाऊन कोविड तपासणी करुन घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केलं आहे.
तसंच संबंधित व्यक्तींनी गृहविलगीकरणात राहून नियमांचे कोटेकोरपणे पालन करावं. कुंभमेळ्यात गेलेल्या आणि परत आल्यावर गृहविलगीकरणात न राहणाऱ्या व्यक्तींबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास त्यांनी वर्ध्याच्या पोलीस नियंत्रण कक्षाला 100 या क्रमांकावर संपर्क करावा, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.