US and Russia : अमेरिका आणि रशियात युध्द अटळ? जागतिक पातळीवर चर्चांना उधाण : ABP Majha
युक्रेनच्या मुद्द्यावरुन अमेरिका आणि रशियातला तणाव दिवसेंदिवस वाढतच चाललाय.. आणि आता तर अमेरिकेनं नागरिकांना दिलेला सल्ला पाहता युद्ध अटळ आहे का अशी जोरदार चर्चा रंगू लागली आहे..युक्रेनसोबत सुरु असल्याने तणावामुळे सध्या रशियात प्रवास करु नका असा सल्ला अमेरिकेनं आपल्या नागरिकांना दिलाय..युक्रेनच्या राजधानीत असणाऱ्या अमेरिकन राजदूतांच्या कुटुंबांना तात्काळ देश सोडण्यास सांगण्यात आलं आहे. रशियाकडून घुसखोरी करण्याची भीती असल्याने हा आदेश देण्यात आला आहे.रशियाने युक्रेनलगत सीमेवर एक लाखाहून अधिक सैन्य जमा केलं आहे. यामुळे रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अटळ असल्याचं बोललं जात आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर एक लाखाहून अधिक खडे सैन्य जमवल्यामुळे क्रिमियाप्रमाणेच युक्रेनच्या आणखी एखाद्या भूभागावर कब्जा करण्याचा रशियाचा इरादा असावा, अशीही चर्चा सुरू आहे