एक्स्प्लोर
VP Jagdeep Dhankhar Resignation | आजारपण की राजकारण? दिल्लीत मोठी उलथापालथ! Nitish Kumar यांच्या नावाची चर्चा
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आजारपणाचे कारण देत तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. धनखड यांच्या राजीनाम्यावरून Congress ने काही सवाल उपस्थित केले आहेत. BJP च्या वरिष्ठ पातळीवर राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे. धनखड यांच्या राजीनाम्यानंतर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनखड Rajya Sabha मध्ये सभापती स्थानी उपस्थित होते. त्यांनी न्यायमूर्ती Verma यांच्यावरील विरोधकांचा महाभियोग प्रस्ताव स्वीकारल्याचं जाहीर केलं. काल सदनाच्या संपूर्ण कालावधीत धनखड आजारी दिसले नाहीत. काल दिवसभर पंतप्रधानही संसद भवन परिसरात उपस्थित होते. संध्याकाळी पंतप्रधानांसह वरिष्ठ मंत्र्यांची एक बैठक झाली. या बैठका न्यायमूर्ती Verma यांच्या महाभियोग प्रस्तावाबाबत असल्याची चर्चा आहे, मात्र त्या धनखड यांच्या संदर्भात होत्या का, असाही सवाल आता उपस्थित होतोय. खासदारांनी या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया दिली की, "देश के सबसे महत्वपूर्ण दूसरे संवैधानिक पद पर बैठने वाले व्यक्तिने फैसला क्यों लिया?" बिहारमधील RJD आमदार Mukesh Roushan यांनी Nitish Kumar यांना उपराष्ट्रपती करण्यासाठी धनखड यांचा राजीनामा घेतला असा दावा केला. मात्र, JDU चे मंत्री Madan Saini यांनी हा दावा फेटाळला आहे. दिल्लीत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
व्यापार-उद्योग
विश्व
Advertisement
Advertisement


















