एक्स्प्लोर
Vote Theft Allegation | Prithviraj Chavan यांच्या नातेवाईकांवर 'Duplicate Voting' चा आरोप
राहुल गांधींनी मतचोरीच्या आरोपांवरून रान उठवले असतानाच भाजपने काँग्रेसला त्याच मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निकटवर्तीयांवर दुबार मतदानाचा आरोप केला आहे. चव्हाण यांचे पुतणे इंद्रजित चव्हाण, त्यांच्या पत्नी, आई आणि मुलाची तीन ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी असल्याचा भाजपचा आरोप आहे. तसेच, चव्हाण यांचे दुसरे पुतणे राहुल चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांचेही तीन ठिकाणी मतदान असल्याचा दावा करण्यात आला आहे. वय बदलून नाव नोंदणी केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. चव्हाण यांचे स्वीय सहायक गजानन आवळकर आणि त्यांच्या कुटुंबियांचीही दोन ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजप प्रवक्ते मोहन जाधव यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबतचे पुरावे सादर केले. या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "अतुलबाबा भोसलेंनी या ठिकाणी जे सत्य समोर आणलेलं आहे, त्यातनं खरे वोटचोर कोण आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे। आता वोट चोरीचा सगळा कॉन्ट्रॅक्ट राहुल गांधींनीच घेतलेला आहे आणि त्यांचेच लोक या ठिकाणी वोट चोरी करतायत हे लक्षात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे." असे मुख्यमंत्री म्हणाले. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसमध्ये मतचोरीचा मास्टर प्लॅन तयार झाला का, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजपने केली आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा




















