एक्स्प्लोर
Vitthal Temple : 'विठ्ठलचरणी 2 टन फुलांची आरास', बीडच्या भक्ताकडून लक्ष्मीपूजनासाठी सेवा
दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या (Lakshmi Pujan) मुहूर्तावर पंढरपूरमधील (Pandharpur) विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला (Vitthal-Rukmini Mandir) अत्यंत आकर्षक आणि मनमोहक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. ही सजावट करण्याची सेवा बीड जिल्ह्यातील (Beed) एका भाविकाने अर्पण केली आहे. या सजावटीसाठी जवळपास दोन टन विविध प्रकारच्या फुलांचा वापर करण्यात आला, ज्यामुळे 'विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा परिसर रंग, सुगंध आणि भक्तिभावानं उजळून निघाला आहे'. वापरण्यात आलेल्या फुलांमध्ये पांढरी शेवंती, झेंडू, गुलाब, अष्टर आणि कामिनी यांचा समावेश आहे. या सेवेसाठी पुणे येथील 'श्री फ्लॉवर्स'च्या सुमारे २५ कलाकारांनी परिश्रम घेतले. या नेत्रदीपक सजावटीमुळे मंदिराचे संपूर्ण रुपडे पालटून गेले असून, देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटत आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
भारत
क्राईम
Advertisement
Advertisement


















