Vilas Shinde Nashik : सुधाकर बडगुजरांवर हल्लाबोल;नाराज विलास शिंदे राऊतांची भेट घेणार ABP MAJHA
Vilas Shinde Nashik : सुधाकर बडगुजरांवर हल्लाबोल;नाराज विलास शिंदे राऊतांची भेट घेणार ABP MAJHA
Vilas Shinde : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील ठाकरे गटामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटातील (Shiv Sena UBT) बडे राजकीय नेते आपल्या गळाला लावण्याचे काम सुरु केले आहे. आता ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे (Vilas Shinde) हे देखील शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आठवडाभरात विलास शिंदे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोघांची दुसऱ्यांदा भेट झाली आहे. त्यामुळे पक्षातरांच्या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे नाराज महानगर प्रमुख विलास शिंदे हे आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेणार आहेत. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विलास शिंदे यांनी शिवसेनेचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी "विलास शिंदे नाराज आहेत" असा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली होती. यावर विलास शिंदे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.























