Vageesh Saraswat on Raj Uddhav : मराठीचा मुद्दा-दोन भावांमधील युती; MNS नेते वागिश सारस्वत EXCLUSIVE
Vageesh Saraswat on Raj Uddhav : मराठीचा मुद्दा-दोन भावांमधील युती; MNS नेते वागिश सारस्वत EXCLUSIVE
हे ही वाचा..
दोन दिवसांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील मोबाईल दुकानामध्ये ग्राहक आणि दुकानामधील कर्मचाऱ्यांच्या वादानंतर मराठी ग्राहकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. मराठी ग्राहकानं परप्रांतीय दुकानादारा विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांच्याकडे तक्रार केली. यानंतर राजन विचारे यांनी त्या दुकानदाराला बोलावून जाब विचारला. दुकानदाराला ग्राहकांची माफी मागायला लावली. यावेळी मारहाण झालेल्या व्यक्तीनं राजन विचारेंसमोरच दुकानदाराच्या कानशिलात लगावली. आदित्य ठाकरे आणि मंत्री नितेश राणे यांचा या प्रकरणी प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
वाद कशामुळं घडला?
हे प्रकरण दोन दिवसांपूर्वीचं आहे. त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे रेल्वे स्थानकाजवळील मोबाईल दुकानात रिचार्ज घेण्यासाठी गेलेल्या मराठी ग्राहकाला रिचार्ज करण्यासाठी ताटकळत ठेवल्याने मराठी तरुणाने जाब विचारल्यानंतर दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली होती. शिवीगाळ आणि एकमेकांवर ओरडण्याचं रुपांतर हाणामारीत झालं. दुकान मालकासह तीन ते चार तरुणांनी मराठी तरुणाला बेदम मारहाण केली होती. याचा व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.























