Ujjwal Nikam on Maharashtra Politics :Thackeray गटाने घटनापीठाकडे जाण्यास उशीर केला
Ujjwal Nikam on Maharashtra Politics : राज्यातील सत्ता संघर्षाचा वाद हाताळण्यात उद्धव ठाकरे गटाचा अभ्यास कमी मत ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ऍड उज्वल निकम यांनी व्यक्त केले. विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यावर जर का आमदारांनी अविश्वास ठराव आणला असेल त्या परिस्थितीमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या अधिकारासंदर्भात नाबाम रबिया खटल्याचा पाच न्यायाधीशांच्या घटनापिठाचा निर्णय हा आपल्या विरोधात जाऊ शकतो. त्यामुळे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्ष प्रकरणाची सुनावणी सात न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे व्हावी अशी मागणी केली आहे. मात्र पाच न्यायाधीशाच्या घटनापीठावरून सात न्यायाधीशाच्या घटनापिठाची मागणी करायला देखील ठाकरे गटाने उशीर केल्याचे मत ऍड उज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.






















