एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Dasara Melava : उद्धव ठाकरेंचं टार्गेट बदललं, शिंदेंना सोडलं..भाजपला झोडलं
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले. त्यांनी राज ठाकरेंसोबत युतीचे स्पष्ट संकेत दिले. "आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठीच," असे ते म्हणाले. मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदेंपेक्षा BJP वर जास्त टीका केली. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांवर तोफ डागली. संघाच्या शंभर वर्षांच्या विषारी फळांवरही त्यांनी टीका केली. मुंबई महापालिका सव्वा दोन लाख कोटींच्या तुटीत असल्याचे त्यांनी नमूद केले. India Today च्या 'मोस्ट पॉप्युलर चीफ मिनिस्टर' सर्वेक्षणात देवेंद्र फडणवीस दहाव्या स्थानावर असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेला संकटातून बाहेर काढण्यासाठी निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रिकेट
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















