एक्स्प्लोर
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे भस्म्या रोग झालेला Anaconda, एकनाथ शिंदेंच प्रत्युत्तर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार टीका केली आहे, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबईतील मतदार यादीत (Voter list) घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. 'तो अॅनाकोंडा (Anaconda) आज येऊन गेला, त्याला मुंबई गिळायची आहे, पण त्याचं पोट फाडून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही,' अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर हल्लाबोल केला. मुंबईतील रुग्णांची खिचडी, रस्त्यातील डांबर आणि भूखंड गिळूनही त्यांचं पोट भरत नाही, असा आरोपही त्यांनी केला. याला उत्तर देताना, आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू होऊ नये, असं म्हणत भाजप (BJP) नेत्यांनी त्यांच्यावर पलटवार केला. आदित्य यांनी मतदार याद्या मोजण्यापेक्षा मुंबई महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या याद्या मोजल्या असत्या, असा टोलाही लगावण्यात आला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















