Uday Samant on Aashish Shelar : सरवणकरांना डावलणं अयोग्य; पडत्या काळात तेच सोबत
Uday Samant on Aashish Shelar : सरवणकरांना डावलणं अयोग्य; पडत्या काळात तेच सोबत
विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर कोण कुठून लढणार हे निश्चित होत आहे. बहुतांश मतदारसंघातील लढती आता निश्चित झाल्या असून मुंबईतील दोन्ही ठाकरेंच्या लढती फिक्स झाल्या आहेत. शिवसेना युबीटीचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हे वरळीतून मैदानात उतरले आहेत. आदित्य यांना शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा तर मनसेकडून संदीप देशपांडे यांचे आव्हान आहे. दुसरीकडे माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे (Amit Thackeray) पहिल्यांदाच विधानसभा लढवत आहेत. येथून शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर यांचे आव्हान अमित ठाकरेंना आहे. तसेच, शिवसेना युबीटीचे महेश सावंत हेही मैदानात आहेत. मात्र, अमित ठाकरेंविरुद्ध महायुतीने उमेदवार देऊ नये, असा सूर मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आवळला आहे. त्यावर, आता शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी भूमिका मांडली. त्यावेळी, सदा सरवणकर यांची बाजू घेत त्यांना तिकीट देणं चुकीचं नाही, असे स्पष्टपणे म्हटलं आहे.
ज्यांनी एकनाथ शिंदेंना सुरूवातीपासून साथ दिली, त्या सदा सरवणकरांना तिकिट देणं चुकीचं नाही. मात्र, राज ठाकरेंचे चिरंजीव तिथून निवडणूक लढणवणार असतील तर त्याबद्दल निर्णय ज्येष्ठ नेते घेतील.आमदार आशिष शेलार जे म्हणाले ती कदाचित भाजपची भूमिका असू शकते. मात्र, त्याबद्दलचा निर्णय ज्येष्ठ मंडळीच घेतील, असे म्हणत उदय सामंत यांनी माहीम मतदारसंघातील उमेदवारीबाबतचा निर्णय वरिष्ठांच्या चर्चेतील असल्याचे म्हटले. सदा सरवणकरांनी पडत्या काळामधे शिंदे साहेबांना मदत केली. मात्र, त्यांना तिकिट द्यायचं की नाही हे एकनाथ शिंदे ठरवतील. काल अमित ठाकरेंची एक मुलाखत पाहिली, ज्यामधे त्यांनी उबाठाचं खरं रूप काय आहे हे मुलाखातीत सांगितलं, असे म्हणत अमित ठाकरेंचं कौतूक करताना शिवसेना युबीटी पक्षावर हल्लाबोलही केला आहे.
![Walmik Karad Wife Reaction : दोषी असतील तर कारवाई होईल, वाल्मिक कराडची पत्नी म्हणाली...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/14/43adf7bd64d673cb9f48c85c60868f6b1736871711037977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/14/f91e150c501ad19fbf1669165936af131736865409607977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/14/00247863de5d777105a7d66c6d718b1a1736860427889977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/14/4a43ae05f26ed89bf8e77eb1a0b57b231736856376238977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/14/220b9bf0aaabb8cfdc1a169d86ec0eee1736852894628977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)