Tuljapur : तुळजापूरात चौथ्या मजल्यावरून पडल्यानं पोलिसाचा मृत्यू, दुसरा पोलीस कर्मचारी जखमी
तुळजापूर शहरातील दोन पोलिस कर्मचारी चौथ्या मजल्यावरच्या जिन्यावरून पडल्याची घटना घडली आहे. एका फौजदाराचा चौथ्या मजल्यावरच्याा जिन्यावरून पडून मृत्यू झाला आहे. दुसरा पोलीस कर्मचारी जखमी आहे . ही घटना रविवारी रात्री घडली .
उपजिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल गंगाधर किरवाडे (वय 34) हे फौजदार मृत पावले आहेत. योगेश हणमंत सूर्यवंशी ( वय 38 ) हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असून त्यांना उस्मानाबादच्या रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे .
चौथ्या मजल्यावरून पडल्यानंतर फौजदाराच्या अंगात रॅाड घुसल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती अनिल किरवाडे 2017 साली सेवेत दाखल झाले होते. लातूर जिल्ह्यातील चाकुरचे रहिवाशी होते.



















