(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajasthan Avishkar Kasale : कोटामध्ये कोचिंग क्लासेसमधील टेस्ट एक्झाम्सवर दोन महिन्यांची बंदी
आता एक मोठी बातमी राजस्थानच्या कोटामधून...कोटामध्ये देशभरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येतात. पण आता कोटाच्या सर्व कोचिंग क्लासेसमधील परीक्षा
दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय. काल लातूरच्या विद्यार्थ्याने कोटामध्ये आत्महत्या केली. आणि कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा मोठा निर्णय घेतलाय. कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय. लातूर जिल्ह्यातील उजना गावातील आविष्कार संभाजी कासले हा कोटामध्ये शिकत होता. काल त्याने माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. अविष्कारच्या आत्महत्येचं कारण अजून कळलेलं नाही. अविष्कारच्या आत्महत्येची माहिती अद्याप त्याच्या आईला देण्यातच आली नाही. आणि अविष्कारचा मृतदेह आज संध्याकाळी किंवा उशिरापर्यंत उजना या मूळ गावी आणण्यात येईल.