Traffic Rules Mharashtra: 11 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून नवे नियम लागू ABP Majha
वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं आता चांगलंच महागात पडणार आहे. कारण राज्यात केंद्राच्या मोटर वाहन कायदा २०१९ च्या तरतुदी लागू करण्यात आल्यात. ११ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून सुधारित नियमांनुसार ई-चलान प्रणालीत दंडाच्या रकमेबाबत बदल करण्यात आलेत. त्यामुळे आता दुचाकीस्वारांना मोबाईलवर बोलल्यास २०० रुपयांऐवजी थेट १ हजाराचा दंड भरावा लागणार आहे. नवे नियम आणि दंडाची रक्कम १ डिसेंबरपासूनच लागू होणार होती. पण वाहतूक पोलिसांच्या दंडवसुलीच्या ई-चलान प्रणालीत आता बदल झाल्यानं नवे बदल११ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू झालेत. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना आता शंभरपट दंड भरण्य़ाची तयारी ठेवावी लागणार आहे. वाहन क्रमांक असलेली नंबर प्लेट जर विहीत नमुन्यात नसेल त्यात दादा, मामा, नाना, बाबा फॅन्सी बदल केले असतील तर त्यांनाही दंड भरावा लागणार आहे.






















