Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 3 PM : 18 April 2025: ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 3 PM : 18 April 2025: ABP Majha
ही बातमी पण वाचा
बिहार इलेक्शन येतंय तुम्ही हिंदी घ्या, आम्ही मराठीची बाजू घेतो; आदित्य ठाकरेंनी सांगितलं 'राज'कारण
मुंबई : राज्य सरकारने शालेय शिक्षण विभागासाठी यंदाच्या वर्षीपासून नवीन सीबीएसई (CBSE) धोरण अवलंबलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून इयत्ता पहिलीच्या वर्गापासून विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आता पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना तीन भाषांचे ओझे नको म्हणून या निर्णयाला विरोध होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वच्छ शब्दात या निर्णयाला विरोध केला असून आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही, असे म्हणत मराठी भाषेतच शालेय शिक्षण देण्याचा आग्रह त्यांनी केलाय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या निर्णयावर ठाम असल्याचे सांगत हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्याचे म्हटले. आता, शिवसेना युबीटी आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही भाषेच्या मुद्द्यावरुन आपली भूमिका स्पष्ट केली.
राजकारण बघायचे असेल तर योगायोग बघा, परवा भेटीगाठी झाल्या, पाठिंबा, विरोधाची चर्चा झाली. कदाचित बिहार इलेक्शन येणार आहेत, यात तुम्ही हिंदी भाषा घ्या आणि आम्ही मराठीची बाजू घेतो असे काहीतरी झाले असेल, असा राजकीय कयास बांधून राज ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. जेवढ्या भाषा तुम्हाला येतील तितकी तुमची प्रगती होते, युपीएससीमध्ये पण स्थानिक भाषा बोलणारे असतात. आपली आताची जी शिक्षण पद्धती आहे, त्यात मुंबई महापालिकेत मराठी, हिंदी, इंग्लिश, अशा अनेक भाषा शिकवतो, पण त्यात मराठी सक्तीची होती. पहिली पासून शिकवताना 3 भाषा ही मुलांवर जरा जास्त सक्ती आहे असे वाटत नाही का? त्यापेक्षा हळू हळू ती शिकवायला सुरुवात करावी, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.























