Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 15 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 15 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
हेही वाचा :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. धर्मराज कश्यप, गुरमैल सिंग आणि प्रवीण लोणकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, मोहम्मद झीशान अख्तर, शिवकुमार गौतम आणि शुभम लोणकर हे तिघे फरार आहेत, पोलिसांकडून या तिघांचा शोध घेतला जात आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचं कनेक्शन समोर आलं आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात बिश्नोई गँगचं पुणे, हरियाणा आणि पंजाब यूनिट कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता, त्यामध्ये बिश्नोई गँगचं हरियाणा आणि पंजाब यूनिट सक्रीय असल्याची माहिती आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी शुभम लोणकर याची मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात चौकशी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शुभम लोणकरला संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं आणि चौकशी केली होती.सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता त्यामध्ये शुभम लोणकरची कोणती भूमिका समोर आली नव्हती त्यामुळं त्याला सोडून देण्यात आलं होतं.