Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
अंधेरीत पर्जन्य जलवाहिनीत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी नियुक्त सखोल चौकशी करून तीन दिवसात अहवाल सादर करावा - महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांचे आदेश मुंबईत काल (दिनांक २५ सप्टेंबर २०२४) सायंकाळी मुसळधार पावसाप्रसंगी, अंधेरी (पूर्व) मधील सीप्झ परिसरात एका महिलेचा पर्जन्य जलवाहिनीत कोसळून दुर्दैवी मृत्यू ओढवला. या घटनेची सखोल चौकशी करून तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच त्यासाठी तीन सदस्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय चौकशी देखील नियुक्त करण्यात आली आहे. या उच्चस्तरीय चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून परिमंडळ ३ चे उप आयुक्त श्री. देविदास क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. रवींद्र अंबुलगेकर आणि प्रमुख अभियंता (दक्षता) श्री. अविनाश तांबेवाघ हे समितीचे उर्वरित दोन सदस्य आहेत. सीप्झ मध्ये पर्जन्य जलवाहिनीत कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू ओढवला, त्या घटनेची सखोल चौकशी करून तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त महोदयांनी दिले आहेत. *