एक्स्प्लोर
Thane Ward Structure | ठाणे प्रभाग रचना सुनावणीत मविआ नेते जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप
ठाणे महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील सुनावणी सुरू झाली आहे. या प्रारूप रचनेवर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. महाविकास आघाडीचे नेते राजन विचारे, जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव आणि केदार दिघे हे महानगरपालिकेत उपस्थित राहून आक्षेप नोंदवत आहेत. त्यांचा मुख्य आक्षेप एन्युमरेशन ब्लॉक (EB) डेटा न दिल्याबद्दल आहे. आक्षेप घेणाऱ्यांनी प्रश्न विचारला, "सर कुठल्याही प्रभाग रचनेचा मूळ आधार हा ईबी आहे. मग जर आम्हाला ईबी दिला नाही तर मग आम्ही आक्षेप कशा घेऊ?" या डेटाशिवाय आक्षेप नोंदवणे अशक्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेने EB डेटा सेन्सस कमिशनची मालमत्ता असल्याचे सांगितले असून, तो शेअर करण्याबाबत स्पष्टीकरण मागवले आहे. तसेच, प्रभाग लोकसंख्येच्या टक्केवारीत विसंगती असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला, ज्यात 10% परवानगी असताना 111% वाढ झाल्याची उदाहरणे आणि वॉर्ड क्रमांक 48, 24 आणि 25 मधील इतर गणितीय विसंगतींचा समावेश आहे. EB डेटा एक खुला दस्तऐवज असून तो नागरिकांना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आक्षेप घेणाऱ्यांनी केली.
महाराष्ट्र
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
आणखी पाहा






















