एक्स्प्लोर
Delhi Terror: २९०० किलो स्फोटकं, AK-47 जप्त, मोठा दहशतवादी कट उधळला, दोन डॉक्टरांसह ७ जणांना अटक
जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) पोलीस, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) पोलीस आणि हरियाणा (Haryana) पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश झाला आहे. या कारवाईत दोन डॉक्टरांसह सात दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून, यामध्ये युपीचे डॉक्टर आदिल आणि हरियाणाचे डॉक्टर मुजम्मिल यांचा समावेश आहे. J&K आणि हरियाणा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत, अल-फलाह युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर मुझम्मिल शकील याला अटक करण्यात आली. या मोठ्या कारवाईत एकूण २९०० किलो स्फोटके, AK-47 रायफल्स आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला एक आरोपी डॉक्टर अल-फलाह युनिव्हर्सिटीमध्ये (Al-Falah University) शिकवत होता आणि त्याच्या लॉकरमध्ये दोन एके-47 रायफली आढळून आल्या. या प्रकरणाचे धागेदोरे जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि गुजरात या चार राज्यांशी जोडले गेले असून, अटक करण्यात आलेले दहशतवादी 'अंसार गजवत-उल-हिंद' (Ansar Ghazwat-ul-Hind) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















