एक्स्प्लोर

Sushma Andhare:नारायण राणे म्हणाले,आमचा इतिहास माहीत नाही का?अंधारेंनी इतिहासाची 3 पानं वाचून दाखवली

Sushma Andhare:नारायण राणे म्हणाले,आमचा इतिहास माहीत नाही का?अंधारेंनी इतिहासाची 3 पानं वाचून दाखवली

पुणे: राजकोट किल्ल्यावर बुधवारी झालेल्या जोरदार राड्यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार आगपाखड केली होती. राजकोट किल्ल्यावर वादाला आम्ही सुरुवात केली नाही, त्यांचे लोकच आमच्या अंगावर आले.आम्हाला काही करायचे असतं तर आम्ही चिरीमिरी करत नाही ओ, एकही पोहोचू शकला नसता घरापर्यंत. तुम्हाला आमचा इतिहास माहिती नाही का, असे वक्तव्य करत नारायण राणे यांनी विरोधकांना डिवचले होते. त्यांच्या या वक्तव्याचा गुरुवारी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला. सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यावर आजपर्यंतच्या कारकीर्दीत झालेल्या गंभीर आरोपांची जंत्री काढत त्यांचा इतिहास मांडला. त्या गुरुवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. 

यावेळी सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. नारायण राणे म्हणतात की, तुम्हाला माझा इतिहास माहिती नाही का? होय नारायण राव तुमचा इतिहास आम्हाला चांगला माहिती आहे. तुमचा इतिहास पोल्ट्री फार्म पासूनचा आम्हाला माहिती आहे. तुमचा इतिहास आम्हाला तिथंपासून माहिती आहे, 1990 ला जी कणकवली कधीकाळी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या समाजवादी विचारांनी भारावलेली होती त्या कणकवलीला गुन्हेगाराचा आखाडा करणे हे तुम्ही केले. राणे साहेब तुमचा इतिहास मला इतका पक्का माहिती आहे की, 1990 ला श्रीधर नाईकांची जी हत्या झाली त्या  हत्येचे तुम्ही मुख्य आरोपी होतात. तुमच्यावर खटला चालवला गेलाय तुमचा इतिहास इतका मोठा आहे की, 2002 ला सत्यजित भिसे चे जे कणकवलीत हत्या झाली त्याचाही आरोप तुमच्यावर होता. यावर देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या पटलावर बोलले होते आणि न्यायालयात खटला चाललाय. 2009 ला राणेजी तुमचे स्वतःचे सखे चुलत भाऊ अंकुश राणे यांचा मृतदेह हा सिंधुदुर्गाला अत्यंत विकृत अवस्थेत मिळाला होता, हा तुमचा इतिहास आहे. तुमचा इतिहास हा आहे की, मुलुंडचा एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्या याने अविघ्न पार्क मधला जो सगळा घोटाळा आहे तो घोटाळा काढून तुमच्या मागे ईडी लावली. नारायण राणे तुमचा इतिहास आम्हाला इतका माहिती आहे की, ज्या राहुल गांधीजींची तुम्ही आता जात काढताय त्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय राहुलजी यांच्या आई सोनिया गांधी यांच्या पायावर  मुजरे करायला तुम्ही सातत्याने दिल्लीच्या वाऱ्या करत होता हा तुमचा इतिहास मला माहिती आहे, अशी खोचक टिप्पणी सुषमा अंधारे यांनी केली.

महाराष्ट्र व्हिडीओ

Beed Sarpanch santosh Deshmukh Case : बीड सरपंच प्रकरणात 3 जणांना अटक; A to Z Updates माझावर
Beed Sarpanch santosh Deshmukh Case : बीड सरपंच प्रकरणात 3 जणांना अटक; A to Z Updates माझावर

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

365 दिवस शाळा, भारतीय संविधान तोंडपाठ, दोन्ही हातांनी लिहितात विद्यार्थी; नाशिकमधील 'या' शाळेच्या मुलांचं टॅलेंट पाहून शिक्षणमंत्रीही अवाक!
365 दिवस शाळा, भारतीय संविधान तोंडपाठ, दोन्ही हातांनी लिहितात विद्यार्थी; नाशिकमधील 'या' शाळेच्या मुलांचं टॅलेंट पाहून शिक्षणमंत्रीही अवाक!
'तर भर चौकात फाशी घेईन, अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..' वाल्मिक कराडने वापरलेल्या गाडीमालकाची स्पष्टोक्ती
'तर भर चौकात फाशी घेईन, अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..' वाल्मिक कराडने वापरलेल्या गाडीमालकाची स्पष्टोक्ती
Donald Trump : लैंगिक संबंध लपवण्यासाठी पॉर्न स्टारला पैसा दिला, ट्रम्प यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार अन् 20 तारखेला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ! अडचणीत सापडणार?
लैंगिक संबंध लपवण्यासाठी पॉर्न स्टारला पैसा दिला, ट्रम्प यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार अन् 20 तारखेला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ! अडचणीत सापडणार?
Mumbai Crime : शिक्षक की हैवान... अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...; मुंबईत खळबळ
शिक्षक की हैवान... अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...; मुंबईत खळबळ
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Beed Sarpanch santosh Deshmukh Case : बीड सरपंच प्रकरणात 3 जणांना अटक; A to Z Updates माझावरBeed Santosh Deshmukh Case : बीड प्रकरणी आरोपींवर सक्त कारवाई झाली पाहिजे : Anjali DamaniaSuresh Dhas On Beed Santosh Deshmukh Case : Sudarshan Ghule हा केवळ प्यादं! मुख्य आरोपी 'आका' आहे : Suresh DhasBeed Santosh Deshmukh Case : बीड हत्या प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
365 दिवस शाळा, भारतीय संविधान तोंडपाठ, दोन्ही हातांनी लिहितात विद्यार्थी; नाशिकमधील 'या' शाळेच्या मुलांचं टॅलेंट पाहून शिक्षणमंत्रीही अवाक!
365 दिवस शाळा, भारतीय संविधान तोंडपाठ, दोन्ही हातांनी लिहितात विद्यार्थी; नाशिकमधील 'या' शाळेच्या मुलांचं टॅलेंट पाहून शिक्षणमंत्रीही अवाक!
'तर भर चौकात फाशी घेईन, अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..' वाल्मिक कराडने वापरलेल्या गाडीमालकाची स्पष्टोक्ती
'तर भर चौकात फाशी घेईन, अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..' वाल्मिक कराडने वापरलेल्या गाडीमालकाची स्पष्टोक्ती
Donald Trump : लैंगिक संबंध लपवण्यासाठी पॉर्न स्टारला पैसा दिला, ट्रम्प यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार अन् 20 तारखेला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ! अडचणीत सापडणार?
लैंगिक संबंध लपवण्यासाठी पॉर्न स्टारला पैसा दिला, ट्रम्प यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार अन् 20 तारखेला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ! अडचणीत सापडणार?
Mumbai Crime : शिक्षक की हैवान... अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...; मुंबईत खळबळ
शिक्षक की हैवान... अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...; मुंबईत खळबळ
Ajmer Dargah : अजमेर दर्ग्यात पीएम मोदी चादर चढवणार; दर्ग्याचे वेब पोर्टल अन् यात्रेकरूंसाठी 'गरीब नवाज' ॲपही लॉन्च केलं जाणार
अजमेर दर्ग्यात पीएम मोदी चादर चढवणार; दर्ग्याचे वेब पोर्टल अन् यात्रेकरूंसाठी 'गरीब नवाज' ॲपही लॉन्च केलं जाणार
Guardian Ministers List : उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? समोर आली संभाव्य यादी
उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? समोर आली संभाव्य यादी
Human Metapneumovirus Virus : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या व्हायरसचा उद्रेक; भारतात येण्याचा धोका आहे का? केंद्र सरकारने कोणती माहिती दिली??
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या व्हायरसचा उद्रेक; भारतात येण्याचा धोका आहे का? केंद्र सरकारने कोणती माहिती दिली??
Ind vs Aus 5th Test : सेनापती जायबंदी, मैदान सोडले, पण मावळ्यांनी कामगिरी फत्ते केली; ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला वळवळण्याची संधीच दिली नाही!
सेनापती जायबंदी, मैदान सोडले, पण मावळ्यांनी कामगिरी फत्ते केली; ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला वळवळण्याची संधीच दिली नाही!
Embed widget