Covid Task Force : सुप्रीम कोर्टाच्या 'ऑक्सिजन नॅशनल टास्क फोर्स'मध्ये महाराष्ट्राच्या दोन ज्येष्ठ डॉक्टरांचा समावेश
मुंबई : कोरोनाच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऑक्सिजनची टंचाई संपूर्ण देशात निर्माण झाली आहे. आपल्याला परदेशातूनही ऑक्सिजन आयात करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीची गंभीर दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने ऑक्सिजनची गरज, उपलब्धता आणि त्याचे वितरण या संदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यासाठी देशातील 12 डॉक्टरांचा नॅशनल टास्क फोर्स तयार केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या टास्क फोर्समध्ये महाराष्ट्रातील मुंबईमधून दोन डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. हिंदुजा रुग्णालयातील डॉ. झरीर उडवाडिया आणि फोर्टिस रुग्णालयातील डॉ. राहुल पंडित यांचा समावेश असून हे दोन्ही डॉक्टर सध्या राज्याच्या कोविड टास्क फोर्समध्ये कोरोनाच्या उपचारा संदर्भातील मार्गदर्शक सूचना देत असतात.
महत्त्वाच्या बातम्या
























