State Liquor : मद्यनिर्मितीसाठी 30 ते 40 टक्के धान्य वापरणं बंधनकारक, राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्यात मद्यनिर्मिती उद्योगाला चालना देण्यासाठी धान्यांचा वापर वाढवला जाणार आहे. देशी आणि विदेशी मद्य तयार करण्यासाठी किमान तीस ते चाळीस टक्के ज्वारी, बाजरी आणि मका या धान्यांचा वापर करण्याचे बंधन घालण्यात आलं आहे. राज्यात मद्यासाठी उसाच्या मळीपासून तयार होणाऱ्या मद्यकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र मद्याची वाढती मागणी लक्षात घेऊन धान्यांचा वापर करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी घेतला होता. मात्र यावर झालेल्या टीकेनंतर हा निर्णय सरकारला मागे घ्यावा लागला. आता ठाकरे सरकारने विलासराव देशमुख यांच्या निर्णयाची पुनरावृत्ती केलीय. मद्य उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने धान्यांचा वापर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या



















