ST Strike Called Off : कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेची एसटी संपातून माघार, अध्यक्ष अजय गुजर यांची घोषणा
ST Strike Update : मागील जवळपास दोन महिन्यांपासून सुरु असलेला राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही. त्यात या संपाने आज नवं वळण घेतलं आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ट श्रेणी संघटनेनं सोमवारी (20 डिसेंबर) मंत्रालयात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक घेतली. ज्यानंतर संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी त्यांच्याकडून एसटी संप मागे घेतल्याचे जाहीरही केले. पण एसटी विलगीकरणाच्या मागणीच्या पूर्ततेशिवाय माघार घेतल्याने इतर संपकरी आक्रमक झाले असून हा संप अजूनही मागे घेतली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान गुजर यांनी संपातून माघार घेतल्याने संपात फूट पडल्याच्या चर्चेलाही उधान आलं आहे.




















