ST Workers Strike : आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी संप लवकरात लवकर मागे घ्यावा, सरकार कुठेही आठमुठेपणाची भूमिका घेत नाही. उच्च न्यायालयाचा जो काही अहवाल असेल त्यावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. कोणाच्यातरी सांगण्यावरुन, भडकवण्यावरुन एसटी कर्मचाऱ्यांनी स्वत:चे नुकसान करुन घेऊ नये असंही ते म्हणाले.
उच्च न्यायालयाने एसटीच्य विलीनीकरणासंदर्भात एक समिती नेमली आहे. समितीने यावर 12 आठवड्यात अहवाल द्यायचा आहे. त्या अहवालावर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल असं अनिल परब म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संपाचा त्रास हा सामान्य लोकांना होत असून संप मागे घ्यावा आणि सामान्यांचा हा त्रास कमी करावा असंही अनिल परब म्हणाले.























