Kirit Somaiya : किशारी पेडणेकर यांच्याशी संबंधित 4 सदनिका SRA ताब्यात घेणार, सोमय्यांची माहिती
माजी महापौर किशोरी पेडणेकरांशी संबंधित एसआरएच्या चार सदनिका ताब्यात घेतल्या जातील अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलीय. चार सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश एसआरएनं मनपाला दिले आहेत, अशी माहिती सोमय्या यांनी दिलीय. वरळी गोमातानगरमधील सदनिका किशोरी पेडणेकर आणि किश कार्पोरेशन सर्व्हिसेसच्या बेकायदेशीररित्या ताब्यात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यांनी एसआरए प्राधिकरणाकडे तशी तक्रार केली होती. या सदनिकांशी संबंध नसल्याचं पेडणेकर यांनी म्हटलं होतं. पण या सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश एसआरएने दिल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय. चार दिवसांत या सदनिका ताब्यात घेतल्या जातील अशी माहिती सोमय्या यांनी दिलीय.























