Special Report | दिवाळीनंतर वाजणार शाळेची घंटा? चाईल्ड टास्क फोर्सचा सकारात्मक प्रतिसाद
राज्यात कोरोनाचा (maharashtra corona) प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून शाळा आणि महाविद्यालयं (school and colleges) बंद आहेत. शाळा आणि महाविद्यालयं पूर्णपणे कधी सुरु होणार याकडे राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागून आहे. यासंदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. आज मुंबईत बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यात 2 ऑक्टोबर पर्यंत कोरोनाची परिस्थिती बघायची. त्यानंतर कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेता येऊ शकतो. शाळांबाबत लहान मुलांच्या लसी आल्या की त्यांचे लसीकरण करायचे आणि दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याची आमची मानसिकता आहे. तेव्हा त्याबाबत मुख्यमंत्री आढावा घेतील, असं अजित पवार म्हणाले.























