special Report on Rahul Gandhi : भाजपचं स्ट्राईक, काँग्रेसकडून बॅकफायर, आरोप प्रत्यारोपाची फैरी
Special Report on Rahul Gandhi : भाजपचं स्ट्राईक, काँग्रेसकडून बॅकफायर, आरोप प्रत्यारोपाची फैरी
काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे ऑपरेशन सिंदूर बाबत, सरकारच्या भूमिकेबाबत काही शंका, काही प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याला सोशल मीडियावर भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यातही आयटी सेलने राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे. कोणी राहुल गांधींना मीर जाफर म्हणतोय तर कोणी चीनमध्ये बनलेली पाकिस्तानचं मिसाईल..पीडीपीच्या महबुबा मुफ्ती यांनी राहुल गांधीचे प्रश्न योग्य असल्याचा निर्वाळा दिलाय तर भाजपने त्यांना निशाने पाकिस्तान देण्याची मागणी केलीय.ऑपरेशन सिंदूरवरुन सगळे पक्ष एक आहेत असं दिसत असलं तरी,
राजकारण, टीकाटिपण्णी, आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत.ऑपरेशन सिंदूरबाबत परराष्ट्र मंत्र्यांच्या एका वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.
















