Special Report | सोनू सूदला भेटण्यासठी चाहत्याची पायी वारी, हैदराबादहून चाहता पायी मुंबईच्या दिशेने
अभिनेता सोनू सूद याने लॉकडाउनच्या काळात अनेकांची मदत केली. त्याच्या या मदतीमुळे अनेक जण आज ही त्याच्या घराबाहेर मदतीसाठी, आभार व्यक्त करण्यासाठी जमा होत असतात. मात्र आता मी तुम्हाला सोनू सूदचा असा एक चाहता दाखवणार आहोत जो सोनूला भेटण्यासाठी हैदराबादवरून चक्क पायी निघालाय. मूळचा तेलंगणा मधील दोरनापल्ली या गावातील रहिवासी असलेला व्यंकटेश हरिजन हा युवक चालत मुंबईला निघालाय. 1 जून पासून तो दररोज सरासरी 40 किलोमीटर चालतोय. आज 300 किलोमीटर चालत तो सोलापुरात पोहोचला. अभिनेता सोनू सूद हा देवप्रमाणे प्रत्येकाची मदत करतोय. देवाच्या दर्शनासाठी पायीच जायचं असतं. त्यामुळे पायी निघालोय अशी भावना व्यंकटेश याने व्यक्त केली.

















