Special Report Chhagan Bhujbal : भुजबळांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, पक्षांतर्गत प्रश्न सुटणार?
Special Report Chhagan Bhujbal : भुजबळांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, पक्षांतर्गत प्रश्न सुटणार?
मंत्रिपद न मिळाल्यामुळं नाराज असलेले छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एका कार्यक्रमात एका मंचावर एकत्र आले. त्यापूर्वी त्यांनी एकाच गाडीतून एकत्र प्रवासही केला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर एकदाही अजित पवारांना न भेटलेले भुजबळ मुख्यमंत्र्यांना मात्र सलग दुसऱ्यांदा भेटले. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं तोंड भरून कौतुक करत शेरोशायरीही केली. पाहूया, याविषयीचा सविस्तर रिपोर्ट.
हे ही वाचा..
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यात आज (दि.3) त्यांच्या पुतळ्याचे अनावर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) देखील उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) माजी मंत्री छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) पत्रिकेवर एक लिखित संदेश दिला, त्यानंतर दोघांमध्ये काही सेकंदाचा संवादही झाला अन् दोघे एकमेकांकडे हसूही लागले. हे सगळं घडलं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळ्यात पाहायला मिळालं.