Solapur Barshi Scam : सोलापूर जिल्ह्यात अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणारा विशाल फटे पोलिसांना शरण
सोलापूर जिल्ह्यातल्या अनेकांना कोट्यवधींचा चुना लावणारा विशाल फटे अखेरीस काल रात्री पोलिसांसमोर हजर झाला. बार्शीतल्या अनेकांचे पैसे गुनंतवणुकीच्या नावाखाली घेऊना विशाल फटे गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. फटेच्या विरोधात अनेक तक्रारी देखील दाखल झाल्या होत्या.. मात्र अनेक दिवसांनंतर विशाल फटेनं काल एक २७ मिनिटांचा यूट्यूब व्हिडीओ अपलोड करत स्वतःची बाजू मांडली. आणि पोलिसांसमोर हजर होत असल्य़ाचे संकेत दिले होते. अखेर रात्री ८ वाजताच्या सुमारास फटे स्वतःहून सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयात हजर झाला.. काल रात्री जिल्हा शासकीय महाविद्यालयात त्याची वैद्यकीय चाचणी करून त्याला आज न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. त्याच्यावर काय कारवाई होते याकडे अनेक गुंतवणूकदारांचं लक्ष लागलंय.



















