एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Raj Thackeray : राज्यात चित्रिकरण सुरु व्हायला हवं, याविषयी मुख्यमंत्र्यांनाही बोलणार : राज ठाकरे

मुंबई : ब्रेक द चेन अंतर्गत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागला. चित्रिकरण थांबलं. गेल्या वेळी पडला तसा खंड पडू नये म्हणून अनेक निर्मात्यांनी परराज्यात आसरा घेतला. आता जवळपास महिन्याभरापासून तिकडे त्यांचं चित्रिकरण सुरू आहे. परराज्यापेक्षा महाराष्ट्रात चित्रिकरणासाठी लागणाऱ्या सुविधा अधिक आहेत. हे लक्षात घेता, मुंबई, पुणे, नाशिक आदी भागात चित्रिकरण करायला काहीच हरकत नाही असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. मनसे चित्रपट सेनेने आयोजित केलेल्या झूम बैठकीत राज यांनी उपस्थितांचे सगळे मुद्दे ऐकून घेतले आणि ही बैठक संपता संपता आपलं हे मत मांडलं. 

मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या पुढाकाराने मनोरंजनक्षेत्रातल्या मान्यवरांची झूम बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज ठाकरे मार्गदर्शन करणार होते. मराठी चित्रपट, मालिका, नाटक या क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या 50 पेक्षा जास्त मान्यवरांनी या बैठकीत सहभाग घेतला. ही बैठक दीड तास चालली. या बैटकीत अनेक मुद्दे मांडले गेले. यात प्रामुख्याने आले ते चित्रिकरण सुरू करण्याचा मुद्दा. बायोबबल प्रणालीनुसार परराज्यात जर काम होतं तर महाराष्ट्रातही होऊ शकेल असं मत यावेळी मांडण्यात आलं. शिवाय, लोककलावंतांंना आर्थिक पॅकेज मिळावं, थिएटर्स मालकांची झालेली अवस्था, वाद्यवृंदाचे कलाकार, रंगमंच कामगार यांना अनुदान मिळावं, सध्या तयार असलेल्या चित्रपटांबद्दल काय करता येईल असे अनेक मुद्दे यावेळी मांडले गेले. 

राज ठाकरे यांनी शांतपणे सगळ्यांचे मुद्दे ऐकले आणि ते टिपूनही घेतले. यातल्या अनेक मुद्द्यांवर राज ठाकरे बोलले. काही मुद्दे आपण स्वत: मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू असं आश्वासन त्यांनी दिलंच, शिवाय पुढच्या दोन दिवसांत यावर कार्यवाही होईल असा विश्वासही दर्शवला. गरज पडली, तर आपण मुख्यमंत्र्यांसोबतही झूम बैठक करू असं यावेळी त्यांनी सांगितलं. या बैठकीला महेश मांजरेकर, केदार शिंदे, अंकुश चौधरी, लोकेश गुप्ते, सतीश राजवाडे, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, अमित फाळके, कौशल इनामदार, समित कक्कड, आदित्य सरपोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Embed widget