Shivadi Nhava Sheva Sea link : शिवडी न्हावा शेवा सि लिंकच्या रेटवरुन विरोधकांचा टीकेचा सूर
Shivadi Nhava Sheva Sea link : शिवडी न्हावा शेवा सि लिंकच्या रेटवरुन विरोधकांचा टीकेचा सूर
मुंबईला अलिबागशी जोडणाऱ्या शिवडी ते न्हावा शेवा या सागरी सेतूवरील प्रवासासाठी अडीचशे रुपये एकेरी टोल आकारण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या सागरी सेतूसाठी आधी पाचशे रुपये एकेरी टोलचा प्रस्ताव होता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला तो साडेतीनशे रुपयांवर आला. पण अखेर अडीचशे रुपयांचा टोलदर निश्चित करण्यात आला आहे. शिवडी ते न्हावाशेवा हा सागरी सेतू तब्बल २३ किलोमीटरचा असून, देशातला तो सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू आहे. येत्या बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सागरी सेतूचं लोकार्पण करण्यात येणार आहे. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.

















