एक्स्प्लोर
Political Update'आता बस झालं', मंत्री Sanjay Shirsat यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. वयानुसार कधीतरी राजकारण थांबवावे लागेल, असा विचार मनात येत असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे. 'आता बस झालं, चार टर्म आमदार आणि दहा वर्षे नगरसेवक राहिलो आहे,' असे ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत हात-पाय चालतात तोपर्यंत व्यक्तीने काम करावे, पण प्रत्येक वेळी आपणच पदावर राहू असे नाही. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'मी काय २०४० सालापर्यंत राहणार नाही आणि माझी तशी इच्छाही नाही.' त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
करमणूक
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement

















