(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shiv Jayanti 2021 | कोरोनाबरोबर आपलं युद्ध सुरु, मास्क हीच आपली ढाल : CM Uddhav Thackeray UNCUT
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह आहे. शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री आदित्य ठाकरेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, माझं हे दुसरं वर्ष आहे. हा बहुमान जिजाऊ, शिवाजी महाराज आणि तुमच्यामुळं लाभलेलं आहे. आता कोरोनाबरोबर आपलं युद्ध सुरु आहे. या युद्धात मास्क हीच आपली ढाल आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, वातावरण छान आहे, पण तोंडावर मास्क आहे. महाराजांच्या काळातील युद्ध आपल्याला करावे लागत नसले तरी कोरोनाशी आपलं युद्ध सुरू आहे. यासाठी आपली ढाल म्हणजे मास्क आहे. नुसती तलवार हातात घेतली म्हणजे युद्ध जिंकता येत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री छाकरे म्हणाले की, काही साप आहेत. ते वळवळ करतायेत, त्यांना ठेचायचं असतं आणि आपण पुढे जायचं असतं, असं ते म्हणाले. आमदार अतुल बेनके म्हणाले की, अजितदादांना डोळ्याने ओळखणारी भाषा येते. आता मला ती भाषा शिकावी लागणार आहे. का? तर मला दादाच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. अगदी गॉगल घातलं तरी मी दादाच्या मनातलं सगळं ओळखून दाखवणार, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हणताच एकच हशा पिकला.