Sharad Pawar Full Speech : मोदींना हटवणं इंडियाचा अजेंडा, राष्ट्रवादीच्या शिबिरातून पवारांचा निशाणा
Sharad Pawar Full Speech : मोदींना हटवणं इंडियाचा अजेंडा, राष्ट्रवादीच्या शिबिरातून पवारांचा निशाणा
Sharad Pawar Speech : भाजपच्या (BJP) हातात सत्ता आहे. शिवाय आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी उभी केली आहे. जर्मनीत जशी हिटलरची प्रचार यंत्रणा होती असं काम भाजपच्यावतीने सुरू आहे. सातत्यानं सांगितलं जातं 400 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू परंतु भारताच्या दक्षिणेत आणि इतर राज्यात भाजप नाही, अथवा बळकट नाही. देशात भाजपला अनुकूल वातावरण नाही. तरीदेखील 450 जागा जिंकणार हे कोणत्या आधारावर सांगत आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला.
शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर सुरू आहे. या शिबिरात समारोपात शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. पवार यांनी म्हटले की, मागच्या काही दिवसांपासून पक्षातील कार्यकर्ता अस्वस्थ होता. त्यांच्या मनात पक्षाचा विचार पक्का करावा यासाठी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. देशातील चित्रं वेगळं आहे. भाजपच्या हातात सत्ता आहे. त्याशिवाय आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी उभी केली आहे. जर्मनीत जशी हिटलरची प्रचार यंत्रणा होती असं काम भाजपच्या वतीने सुरू असल्याचे पवार यांनी म्हटले.