Sharad Pawar Full PC : आमदार अपात्रतेच्या ऐतिहासिक निकालावर शरद पवारांची UNCUT पत्रकार परिषद
Sharad Pawar Full PC : आमदार अपात्रतेच्या ऐतिहासिक निकालावर शरद पवारांची UNCUT पत्रकार परिषद
Shiv sena MLA Disqualification : राज्याच्या राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता असलेला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकालाचे (Shiv sena MLA Disqualification Verdict Final result) वाचन सध्या सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) या निकालातील केवळ ठळक मुद्दे वाचत आहे. साऱ्या देशाचं लक्ष आजच्या निकालाकडे लागले आहे. एक तास निकाल वाचन सुरू राहणार आहे. ऐतिहासिक महानिकालाचे वाचन सुरू झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे हा निवाडा करण्याची संधी मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आणि विधिमंडळाच्या स्टाफचे आभार, असे राहुल नार्वेकर म्हणाले. शिवसेनेची 1999 सालची घटना वैध असून 2018 साली ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलेली घटनादुरूस्ती मान्य नसल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले. मनात आलं म्हणून कोणलाही काढता येणार नाही, शिंदेंना पदावरून हटवण्याचा अधिकार ठाकरेंना नाही, असेही नार्वेकर म्हणाले.


















