Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
नीट परीक्षेतल्या गोंधळामुळे देशातलं वातावरण सध्या प्रचंड तापलंय... त्यातच आता पुणे विद्यापीठात एक नवा घोटाळा उजेडात आलाय... विद्यापीठाचेच काही अधिकारी लाखो रुपयांना पदव्या विकत असल्याचा आरोप करण्यात आलाय.. विद्यापीठानं याची अंतर्गत चौकशी सुरू केली असताना याची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत, असा प्रश्न आता विद्यार्थी विचारतायत... बघुयात नेमका आरोप काय आहे आणि त्यावर विद्यापीठानं काय पावलं उचललीयेत, आमच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये... ही डिग्री नीट बघा...
विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ...
पदवी प्रमाणपत्रावर छापलंय 'युनिव्हर्सिटी ऑफ पुणे...'
एकेकाळी 'ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट' अशी ओळख असलेलं हे विद्यापीठ पुन्हा चुकीच्या कारणानं चर्चेत आलंय...
काही अधिकारी आणि कर्मचारी बोगस प्रमाणपत्राचं रॅकेट चालवत असल्याचा आरोप झालाय...
महेश कदम यांच्या तक्रारीनंतर विद्यापीठानं खात्यांतर्गत चौकशी सुरू केलीये...
यात दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन विद्यापीठानं दिलंय...
All Shows
































