एक्स्प्लोर

Aamchya Ladkya Naik Bai Marathi Serial Track: भूमिकेसाठी भीतीवर मात… स्टार प्रवाहवरच्या नव्या मालिकेत झळकणार 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली...

Aamchya Ladkya Naik Bai Marathi Serial Track: स्टार प्रवाहवरच्या नव्या मालिकेत प्रेक्षकांचा लाडका चेहरा पुन्हा दिसणार आहे. या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

Aamchya Ladkya Naik Bai Marathi Serial Track: स्टार प्रवाहवरील (Star Pravah) 'आमच्या लाडक्या नाईक बाई' (Aamchya Ladkya Naik Bai) ही मराठी मालिका (Marathi Serial) प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) शारदा ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत. ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर तितक्याच वास्तववादी पद्धतीनं उभी राहावी, यासाठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Marathi Actress Aishwarya Narkar) यांनी अनेक वर्षांनंतर पुन्हा सायकल शिकण्याचं आव्हान स्वीकारलं. मालिकेची कथा अलिबागमधील एका छोट्याशा गावात घडते. आजही अनेक गावांमध्ये सायकल ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे. 

शारदासाठीही ती फक्त दोन चाकांची सायकल नाही, तर तिच्या स्वावलंबनाचं, जिद्दीचं आणि रोजच्या आयुष्याशी सुरू असलेल्या संघर्षाचं प्रतीक आहे. त्यामुळे पडद्यावर प्रत्येक क्षण खरा वाटावा यासाठी ऐश्वर्या यांनी मनापासून सराव केला.

याविषयी बोलताना अभिनेत्री ऐश्वर्या नारकर म्हणाल्या की, "सायकल चालवताना जसा तोल सांभाळावा लागतो त्याचप्रमाणे संसार, नोकरी, नाती आणि स्वतःची स्वप्नं यांचाही तोल प्रत्येक स्त्री रोज सांभाळत असते. शारदाचा हा प्रवास प्रत्येक महिलेला स्वतःचा वाटेल. लहानपणी आम्ही 20 पैशांना भाड्याने सायकल घेऊन चालवायचो. मी काही फार सराईत नव्हते, पण शिकायची जिद्द होती. सायकल वेगात गेली की, धीर यायचा, पण थांबवताना मात्र नेहमीच धडपड व्हायची. इतक्या वर्षांनंतर पुन्हा सायकल हातात घेतली तेव्हा तीच भीती आणि तोच उत्साह पुन्हा अनुभवला. सुरुवातीला हे मोठं आव्हान वाटलं पण आमच्या संपूर्ण टीमने दिलेल्या विश्वासामुळे ते सहज पार पाडता आलं. त्या सरावात माझं बालपण पुन्हा एकदा जगल्यासारखं वाटलं..."

भूमिकेसाठी घेतलेली ही मेहनत ऐश्वर्या नारकर यांच्या अभिनयातील समर्पण अधोरेखित करते. शारदाच्या संघर्षात, तिच्या धैर्यात आणि तिच्या स्वप्नांच्या प्रवासात अनेक महिलांना स्वतःचं प्रतिबिंब दिसेल आणि म्हणूनच 'आमच्या लाडक्या नाईक बाई' ही मालिका प्रत्येक घराशी भावनिक नातं जोडेल. 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan: 'सलमान खान अभिनेता नाहीच, तर...'; स्वत:बद्दल भाईजान असं का बोलला? मुंबईत येण्याचा प्रवास उलगडला
'सलमान खान अभिनेता नाहीच, तर...'; स्वत:बद्दल भाईजान असं का बोलला? मुंबईत येण्याचा प्रवास उलगडला
Sachin Pilgaonkar: सचिन पिळगांवकर बनले डॉक्टर, ITM विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर; मोठ्या कारकि‍र्दीनंतर विशेष सन्मान
सचिन पिळगांवकर बनले डॉक्टर, ITM विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर; मोठ्या कारकि‍र्दीनंतर विशेष सन्मान
Anushka Pimputkar Viral video: तरुणी वृद्ध व्यक्तीच्या जवळ अन्...बसमधील अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, अनुष्का संतापली, म्हणाली 'हे मुद्दाम केलंय'
तरुणी वृद्ध व्यक्तीच्या जवळ अन्...बसमधील अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, अनुष्का संतापली, म्हणाली 'हे मुद्दाम केलंय'
Mitwa Singer Blood Cancer: शाहरुख खानच्या 'मितवा' गाण्याला आवाज देणाऱ्या गायकाला झाला गंभीर आजार, ब्लड कॅन्सरने त्रस्त; स्वत:च दिली हेल्थ अपडेट
शाहरुख खानच्या 'मितवा' गाण्याला आवाज देणाऱ्या गायकाला झाला गंभीर आजार, ब्लड कॅन्सरने त्रस्त; स्वत:च दिली हेल्थ अपडेट

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
Ashish Shelar on Shiv Sen Sonia Gandhi Book : शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
Embed widget