एक्स्प्लोर

Mumbai 1993 Bomb Blast : ...जेव्हा 1993 च्या बॉम्ब स्फोटाबाबत Sharad Pawar खोटं बोलले!

Mumbai 1993 Bomb Blast : मुंबईत नुकतीच दंगल झाली होती आणि त्यातून मुंबई सावरते इतक्यात 12 बॉम्बस्फोटांनी पुन्हा ती हादरली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर होती. अशातच सर्व परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी कोणाला तरी देण्याबाबत दिल्लीत चर्चा सुरु झाल्या. इतक्यात नाव आलं शरद पवारांचं. शरद पवारांना दिल्लीतून मुंबईत पाठवण्यात आलं होतं. त्यांनी हे स्फोट होण्याच्या 6 दिवसांपूर्वीच म्हणजेच, 6 मार्च 1993 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा ताबा घेतला होता. अशातच मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आणण्याची मोठी जबाबदारी तत्कालीन नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर होती. 

बॉम्ब स्फोट घडले आणि ते कुणी घडवले हा अंदाजा सर्वांनाच आला होता. ही हालचाल धार्मिक आणि बदल्याच्या भावनेतून झाली होती आणि या स्फोटांचं कुठेतरी पाकिस्तान कनेक्शन नक्कीच होतं, हे सर्वांसमोर होतं. Fisherman's Colony in Mahim causeway,  Zaveri Bazaar Fort, Plaza Cinema Dadar, Century Bazaar, Katha Bazaar, Hotel Sea Rock, Chhatrapati Shivaji International Airport ,  Air India Building, Hotel Juhu Centaur, Worli, Bombay Stock Exchange, Passport Office अशी या बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणांची नाव होती आणि यात यादीत कुठेही मुस्लीमबहुल भाग नव्हता. त्यामुळे हे स्फोट हिंदूंना संपवण्यासाठी झाले का? असा सूर येण्याची शक्यता होती. पवारांनी नेमकं तेच ओळखलं. आधीच परिस्थिती गंभीर, त्यात महिन्याभरापूर्वीच मुंबई धार्मिकवादातून पेटलेली दंगल. त्यामुळे पुन्हा एकदा वाद उफाळण्याची शक्यता होतीच. 

शरद पवारांनी साखळी बॉम्बस्फोटाची सर्व माहिती घेतली आणि ते थेट दूरदर्शनच्या ऑफिसात पोहोचले. ते मुंबईसोबतच अवघा देश हादरवणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटाबाबत ते जनतेशी संवाद साधणार होते. मुंबईत 12 ठिकाणी स्फोट झालेले असतानाही जनतेला माहिती देताना मात्र शरद पवारांनी 13 ठिकाणी स्फोट झाल्याचं सांगितलं. आणि बॉम्ब स्फोट झालेल्या ठिकाणांच्या यादीत आणखी एक नाव वाढवलं. त्या भागाचं नाव होत, मस्जिद बंदर. मुंबईतील एक मुस्लीमबहुल भाग. 

आता प्रश्न असा आहे की, शरद पवारांनी असं का केलं? तर मी आधी म्हटल्याप्रमाणे, काही महिन्यांपूर्वीच हिंदू-मुस्लीम दंगल उसळली होती आणि कुठेतरी ते प्रकरण ताजं होतं. त्यामुळे या बॉम्ब स्फोटांमध्ये कोणत्या ठराविक धर्माच्या लोकांना टार्गेट केलं नाहीये, असं त्यांना भासवून द्यायचं होतं. आणि प्रसंगावधान राखत त्यांनी हे पाऊल उचललं. नाहीतर कदाचित अजून एक दंगल मुंबईनं पहिली असती. ती दंगल रोखण्यासाठी म्हणून पवारांनी ही शक्कल लढवली आणि सर्व काही सांभाळून घेतलं. 

शरद पवारांनी हा किस्सा अनेक वर्षांनी त्यांची राजकीय आत्मकथा 'लोक माझे सांगाती' या त्यांच्या पुस्तकातून सांगितला. एवढंच नाहीतर त्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमध्ये देखील सांगितला आहे.

एकंदरीत काय... तर जबाबदार मुख्यमंत्री कसा असतो? हे शरद पवारांनी दाखवून दिलं. आणि जबाबदारी ही कागदोपत्री नसते तर विचारात असते इतकं मात्र नक्की.

महाराष्ट्र व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil Health Update: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, दोन दिवसांपासून ताप-थंडी, टायफॉइडचीही लक्षणं; डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, दोन दिवसांपासून ताप-थंडी, टायफॉइडचीही लक्षणं; डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट
Sunil Kendrekar Majha Katta : माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Embed widget