Sharad pawar Katewadi : शरद पवार उद्या काटेवाडीत, पवारांचा पाडवा राज्यात चर्चेचा विषय
Sharad pawar Katewadi : शरद पवार उद्या काटेवाडीत, पवारांचा पाडवा राज्यात चर्चेचा विषय
गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीमध्ये साजऱ्या करण्यात येणाऱ्या पवार घराण्याच्या दिवाळी पाडव्याच्या सोहळ्यात यंदा दुभंग दिसत आहे. बारामतीमध्ये यंदा शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळी पाडव्याचे आयोजन केले आहे. दिवाळी पाडव्याचे पारंपरिक ठिकाण असलेल्या बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवार यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी शरद पवारांशी निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना अप्रत्यक्ष टोले लगावले. फांद्या छाटल्या गेल्या तरी मूळ हे मूळ असतं, अशी भावना शरद पवारांना भेटण्यासाठी आलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याने व्यक्त केली. यावेळी शरद पवार गटाचे आष्टी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मेहबुब शेख यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, आम्ही दरवर्षी पवार साहेबांना पाडव्याला शुभेच्छा द्यायला येतो. त्यांना भेटून आम्हाला नवी प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. दिवाळी पाडव्याला मी शरद पवारांना भेटायला येण्याचं यंदाचं 17 वं वर्ष आहे. कोरोनात पण मी त्यांना भेटायला आलो होतो, पण तेव्हा सुप्रिया सुळे यांना भेटून माघारी गेलो होतो. पण दरवर्षी पाडव्याला पवार साहेबांना भेटायचे, हे आमच्या मनात कायम असते, असे मेहबुब शेख यांनी म्हटले.