एक्स्प्लोर

Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर

Chandrapur Election : काँग्रेसने जर आपल्याला पाठिंबा दिला नाही तर आपल्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं ठाकरे-वंचित गटाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे चंद्रपुरामध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

चंद्रपूर : एकीकडे चंद्रपुरात सर्वात मोठा पक्ष ठरूनही महापौरपदाबाबद काँग्रेसचं काही ठरत नाही, तर दुसरीकडे भाजपनेही सत्तास्थापनेसाठी चाचपणी सुरू केलीय. या स्पर्धेत आता आणखी एका दावेदाराचा समावेश झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने आणि वंचितने त्यांचा एक स्वतंत्र गट तयार केला आहे. जे कुणी आपल्याला महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देऊ असं या गटाने जाहीर केलं आहे.

चंद्रपुरात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेत मोठा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसचे 27 आणि पुरस्कृत तीन अशा 30 जणांचा एक गट आहे. काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी आणखी चार नगरसेवकांची गरज आहे. दुसरीकडे 23 सदस्य असलेल्या भाजपनेही चाचपणी सुरू केली आहे. 

चंद्रपूर ठाकरेंच्या 6 आणि शिंदेंच्या दोन नगरसेवकांनी त्यांचा एक वेगळा गट तयार केला आहे. या गटाने नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी केली. जो आम्हाला महापौर पद देईल त्यांना आम्ही समर्थन देऊ अशी भूमिका घेत महापौर पदाच्या शर्यतीत ट्विस्ट निर्माण केला आहे. काँग्रेसने आमचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर चंद्रपुरात भाजपचे पण दरवाजे आमच्यासाठी उघडे असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी म्हटलंय.   

आपल्या गटाला आणखी दोन अपक्षांचा पाठिंबा असल्याचं शिवसेना-वंचितच्या गटाने दावा केला आहे. 

चंद्रपूर : एकूण नगरसेवक - 66

  • भाजप – 23
  • काँग्रेस – 27
  • काँग्रेस समर्थित जनविकास सेना – 3
  • शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 6
  • वंचित - 2
  • बसपा - 1
  • शिवसेना (शिंदे गट) – 1
  • अपक्ष – 2
  • एमआयएम – 1

काँग्रेसकडे जनविकास सेना मिळून 30 नगरसेवक आहेत, त्यांना बहुमतासाठी चार नगरसेवकांची गरज आहे, शिवसेना उबाठा, दोन अपक्ष, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि बसपा हे हे किंगमेकर च्या भूमिकेत आले आहे

काँग्रेसची गटनोंदणीही रखडली

चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीनंतरही काँग्रेसमधला अंतर्गत गोंधळ कायम आहे. विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत वादामुळे काँग्रेसच्या 27 नगरसेवकांची गटनोंदणीही रखडली आहे. काँग्रेसच्या गटनेतेपदावरून विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये अजूनही एकमत झालेलं नाही. 

विजय वडेट्टीवार यांनी गटनेतेपदासाठी वसंता देशमुख यांचं नाव सुचवलं होतं. तर, धानोरकर यांनी सुरेंद्र अडबाले यांचं नाव सुचवलं होतं. मात्र, दोन्ही नेत्यांनी सुचवलेल्या नावांना एकमेकांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांची गटनोंदणी होऊ शकलेली नाही. त्यातच आता पुढील 3 दिवस सलग सुट्ट्या आहेत. त्यामुळे आता थेट मंगळवारीच काँग्रेसची गटनोंदणी होण्याची शक्यता आहे.

ही बातमी वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिका वादात दोघांचाही हकनाक जीव गेला

शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत

Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिका वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिका वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास

नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा

Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Embed widget