![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sharad Pawar Full Speech : मोदी माझं बोट धरुन राजकारणात आले, मला माझ्या बोटाची काळजी वाटते
Sharad Pawar Full Speech : मोदी माझं बोट धरुन राजकारणात आले, मला माझ्या बोटाची काळजी वाटते
ही बातमी पण वाचा
Sharad Pawar on Narendra Modi, मुंबई : "हे राज्यकर्ते तुमच्या हिताचे नाहीत. नरेंद्र मोदी सांगतात की शरद पवार आणि माझे संबंध चांगले आहेत. त्यांनी असंही म्हटलं की मी पवार साहेबांच बोट धरून राजकारणात आलो. आजकाल जी परिस्थिती आहे त्यातून मला माझ्या बोटाची काळजी वाटतेय. आपलं बोट भलत्याच व्यक्तीच्या हातात दिल्यावर काय होतं ते आता दिसतंय", असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. ते मुंबईत बोलत होते.
देशात अन्न धान्याचा साठा कमी झाल्यामुळे मी फार अस्वस्थ झालो होतो
शरद पवार म्हणाले, मला आठवतंय की ज्या वेळी शेती व्यवसायाची जबाबदारी माझ्यावर आली. मी शपथ घेतली आणि घरी आलो अधिकाऱ्यांनी पहिली फाईल माझ्यासमोर आणली. देशात अन्न धान्याचा साठा कमी झाल्यामुळे मी फार अस्वस्थ झालो. जगाचा पोशिंदा शेतकरी आणि आपल्या देशात दुसऱ्या देशात अन्नधान्य बाहेर आणावं लागलं, पण त्यानंतर भारत जास्त गहू पिकवणारा देश झाला. ज्याच्या हातात सत्ता आहे,आज अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. परीक्षेत बसणारी मुलं दहा दिवस संघर्ष करतात. शिवाय देशातील मुस्लिमांबाबतही शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. दारिद्र रेषेखाली असणाऱ्या मुस्लिमांची संख्या दुर्लक्षित करण्यासाठी नाही, असंही पवारांनी स्पष्ट केलं.
मोदींचा हात लागेल तिथं काहीतरी उलटं सुलट होतंय
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, सकाळी आम्ही मालवण येथील घटनेचा निषेध केला,अनेकजण उपस्थित होते. अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. 1960 साली यशवंतराव मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्याकडे पुतळा बसवला त्याला अजूनही काही झालेलं नाही पण यांचा पुतळा 6 महिन्यात पडला. त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला आलं कोण तर मोदी..त्यांचा हात जिथ लागतोय तिथं काहीतरी उलटं सुलट होतंय. पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली. त्यांनी माफी मागितली आणि लगेच सांगितलं की सावरकर यांची माफी मागण्यात आली नाही. आता विषय काय आहे आणि हे बोलतं आहेत. आता शिवाजी महाराज आणि सावरकर यांची तुलना होऊ शकते? ज्यांनी रयतेच राज्य आणल त्यांची तुलना कशा प्रकारे देशाचे पंतप्रधान करतात हे आपण पाहिलं, असंही शरद पवार म्हणाले.
![National Television Award ABP Majha | नॅशनल टेलिव्हिजन अवॉर्डमध्ये ABP माझाचा डंका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/14/9f69f5a7f95a16ec11bf43b38c3594b71734198227775976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Narendra Modi : काँग्रेस कुटुंबानं संविधानाला धक्का दिला इंदिरा गांधींच्या निर्णयांवर मोदींची टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/14/928419577013766c1d6db667bdbeae741734197975643976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![One Nation one election | एक देश एक निवडणूक! घटना दुरुस्तीत तरतुदी काय असतील? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/14/b9d59890616d6cc1cb245e2f566f48481734197568823976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report One Nation One Election : एक देश एक निवडणूक! नव्या तरतुदी काय असतील?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/14/1b203445a122ca9c7a8f74348497f0271734197304258976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Dadar Hanuman Mandir | हनुमान मंदिरावरून हिंदूत्वाचा एल्गार, ठाकरे-भाजपमध्ये वार Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/14/571b3a7369a5f261574f3e24ca1ea5f51734196167253976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)