Supriya Sule : जेवणाच्या निमंत्रणासाठी पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, सुप्रिया सुळेंची माहिती
पुणे: बारामती नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने (Baramati Namo Rojgar Melava) मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी बारामती दौऱ्यावर असणार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारामतीत एवढा मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यादरम्यान एक मोठी माहिती समोर येत आहे. बारामतीत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी (Sharad Pawar) फोन करून त्यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) विनंतीवरून येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) शरद पवारांचे निमंत्रण स्वीकारणार का हे पाहावं लागेल.


















